मंत्री राठोड यांचा ‘मुंडे होणार’ की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामशास्त्री होणार?

‘सामना’ सिनेमात निळू फुले यांच्या तोंडी एक  यादगार डायलॉग आहे…मारोती कांबळेचं काय झालं? हा मारोती तर केव्हाच गेला.  निळूभाऊही आपल्यात नाहीत.  पण तोच प्रश्न पात्र बदलून विचारण्याची पाळी  जनतेवर आली आहे… ‘पूजा चव्हाणचं काय झालं?’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सखोल चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते  बाहेर येईल.’  भाजप नेते देवेंद्र फडणवीस […]

Read More

पटोले कोणाचे खाते खाणार?

कॉन्ग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी  मंत्रीपदही मागितल्याने  हायकमांड  धर्मसंकटात  सापडली आहे.  पटोले  यांना  मंत्रीपदाची जास्तीची ताकद द्यायची  म्हटले तर  एखाद्या विद्यमान मंत्र्याला घरी पाठवावे लागते.  कॉन्ग्रेसच्या कोट्यातील मंत्र्यांमध्ये  मोठे फेरबदल  होऊ घातले असल्याने   पक्षात नवाच कलह  सुरु झाला आहे. नितीन राऊत यांचे ऊर्जा खाते चालले अशी  चर्चा जोरात सुरु झाली आहे.     ‘मला ऊर्जा […]

Read More

नितीन गडकरींशी आता कोण लढणार?

लोकसभा निवडणुकीला अजून  तीन-साडे तीन वर्षे आहेत. पण चर्चा सुरु झाली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी  यांनी ज्या जोमाने  विकास कामांचा नव्याने धडाका  लावला आहे ते पाहता  तिसऱ्या टर्मलाही ते उभे राहतील.  असे झाले तर मग  गडकरींशी कोण टक्कर घेणार? गेल्या निवडणुकीत    कॉन्ग्रेसचे नाना पटोले यांनी  चांगली टक्कर दिली होती.  […]

Read More

एकटे नाना पटोले काय करणार? – मोरेश्वर बडगे

कॉन्ग्रेसने प्रथमच दणकट माणूस दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पंगा घेण्याची  हिंमत ठेवणारे  ओबीसी नेते ५७ वर्षे वयाचे  नाना फाल्गुनराव पटोले यांना महाराष्ट्र प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष  बनवले आहे.  शुक्रवारी  त्यांचे नाव जाहीर झाले तेव्हा ऊर्जावान अध्यक्ष   मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.   अशोक चव्हाण यांच्यानंतर गेली दोनतीन वर्षे प्रदेशाध्यक्षपद  पश्चिम महाराष्ट्रातले  बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते. थोरात म्हणजे ढकलगाडी. […]

Read More

नाना पटोले होणार प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष

अखेर ठरले.  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष  नाना पटोले  यांना प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय  राहुल गांधी यांनी  घेतला आहे.     संसदीय परंपरेप्रमाणे  विधानसभेचा अध्यक्ष  कुठले राजकीय पद  स्वीकारू शकत नाही.  त्यामुळे पटोले  आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा  उपाध्यक्षाकडे देतील. त्या नंतर  दिल्लीतून त्यांच्या नियुक्तीची घोषणा होईल.                     नाना पटोले यांना   प्रदेश अध्यक्षपदासोबत मंत्रिपदही हवे होते. पण   राहुल गांधींनी तसे  […]

Read More

सांगा, अण्णा हजारे कुणाचे?

काही वर्षापूर्वी  एक व्यंगचित्र सोशल मिडीयावर फिरत होते.   त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे झोपले असून  ‘भाजपचे राज्य गेल्यावर मला उठवा’ असा फलक  शेजारी ठेवला होता.  आज देशात भाजपचे राज्य असले तरी महाराष्ट्रात  शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता आहे.  मग अण्णा  झोपेतून उठले असे आता समजायचे का? कारण  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर  ३० जानेवारीपासून  करायचे उपोषण त्यांनी  बसण्याआधीच […]

Read More

हमाम मे सब नंगे, मुंडे बचावले

अटलबिहारी वाजपेयी यांना पत्रकारांनी एकदा  प्रश्न विचारला होता. आपले लग्न झालेले नाही?   वाजपेयी त्यावर  मिस्कीलपणे म्हणाले होते, ‘माझे लग्न झालेले नाही. पण मी बालब्रम्हचारीही  नाही.’ शब्दात न सापडणाऱ्या  वाजपेयींना  कायदा आणि समाजही पकडू शकला नाही.    राष्ट्रवादी  कॉन्ग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री ४५ वर्षे वयाचे धनंजय मुंडे यांच्या  न झालेल्या  तिसऱ्या लग्नाच्या वादळात वाजपेयींचा हा […]

Read More

संभाजीनगरची लढाई

महापालिकेची निवडणूक तोंडावर आली की  शिवसेनेला  संभाजी महाराज आठवतात.  मराठवाड्यातील औरंगाबाद   शहराचे नाव बदलून  संभाजीनगर  झाले पाहिजे ह्या एका मुद्यावर गेली ३० वर्षे शिवसेनेने औरंगाबादची  सत्ता  खिशात ठेवली आहे.   औरंगाबादची  निवडणूक आता तोंडावर आली असताना  उद्धव ठाकरे सरकारने  संभाजीनगरसाठी हालचाली  वाढवल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी  नाव बदलण्यासाठी  नव्याने प्रस्ताव तयार  करून  राज्य सरकारकडे पाठवला आहे. मंत्रिमंडळ […]

Read More

शरद पवारांच्या हाताखाली काम करायला राहुलबाबा तयार होतील?

राहुल पुन्हा अध्यक्ष व्हावेत ही पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. राहुलबाबा आहे तोपर्यंत आपल्याला अडचण नाही असे मोदींना वाटते. पण कॉन्ग्रेसच्याच बहुतांश नेत्यांना राहुल नको आहेत. हे नेते राहुल यांच्या लहरी राजकारणाला कंटाळले आहेत. उघडपणे कुणी बोलत नाही. पण ह्या नेत्यांशी पवारांचा चांगला याराना आहे.

Read More

नागपूर बनले क्राईम कॅपिटल?

नागपूरचे महापौर भाजप नेते संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याने खळबळ आहे. कुटुंबीयांसह वाढदिवसाची पार्टी करून मध्यरात्री घरी परतताना त्यांच्या कारवर दोघा बाइकस्वारांनी गोळ्या झाडल्या. जोशी बचावले. पण ३५ लाख लोकसंख्येचे नागपूर रक्तबंबाळ आहे. २४ तास उलटूनही हल्लेखोर सापडलेले नाहीत. नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे तपास दिला आहे. विधिमंडळातही आमदारांनी हा विषय मांडताना चिंता व्यक्त केली. सरकारने […]

Read More