‘नागपूरचे वाजपेयी’ दयाशंकर तिवारी नवे महापौर

नागपूरचे महापौरपद भाजपने दोघांना १३-१३ महिन्याचे वाटून दिल्याने ही निवडणूक घ्यावी लागली. मावळते महापौर संदीप जोशी यांचे १३ महिने संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली.

Read More

मराठा आरक्षणाचा तिढा

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची कोंडी फुटता फुटायला तयार नाही. लोकसंख्येने ५२ टक्के असलेल्या ह्या समाजाने आरक्षणासाठी काय काय नाही केले. लाख लाखाचे मोर्चे काढले, ५० तरुणांनी बलिदान दिले, साऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन कायदा केला आणि एसईबीसी आरक्षण दिले. पुढे हे आरक्षण हायकोर्टात टिकले. पण सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. ही स्थगिती उठवावी यासाठी राज्य सरकार […]

Read More

एका संघनिष्ठ व्रतस्थ पत्रकाराचे जाणे -मोरेश्वर बडगे

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रथम प्रवक्ते आणि   संघाच्या तरुण भारत ह्या मुखपत्राचे दीर्घकाळ  संपादक राहिलेले  माधव गोविंद म्हणजे मागो उपाख्य बाबुराव  वैद्य यांच्यासारखा ऋषितुल्य माणूस  वयाच्या ९७ व्या वर्षी आपला निरोप घेतो तेव्हा साऱ्याच विचारांची माणसे  त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतात. तशी ती आता  झाली. मागोंच्या वाट्याला आलेला असा भक्तीभाव  देशातील संघाच्या दुसऱ्या कोण्या पदाधिकाऱ्याच्या  वाट्याला […]

Read More

पंकजा मुंडे यांचा प्रॉब्लेम काय?

पंकजा मुंडे ह्या धूर्त नेत्या आहेत. गोपीनाथगडावर समर्थकांच्या मेळाव्यात श्रेष्ठींना निशाणा करून त्यांनी बंड पुकारले आहे. पंकजा यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जोडीने जोरदार बॅटिंग केली. भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. आपण पक्ष सोडणार नाही असे पंकजा म्हणाल्या. पण त्यांनी कोअर कमिटी सोडली आहे. मुंडे प्रतिष्ठानचे काम सुरू केले आहे. गडावरील मेळाव्यात भाजपची कुठलीही […]

Read More

विधानसभेचा आखाडा आणि उद्धवनीती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा मूड पाहिला तर विधानसभेचा आखाडा होतो की काय अशी भीती वाटली. नागपुरात थंडी आहे. पण विधानभवन तापले आहे. राहुल गांधी विधानसभेचे सदस्य नाहीत. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भाजप आमदारांच्या हाती आयते हत्यार आले आहे. विधानभवनात आत-बाहेर सावरकरच सावरकर चालले. ‘मी पण सावरकर’ असे […]

Read More

नागपूर बनले क्राईम कॅपिटल?

नागपूरचे महापौर भाजप नेते संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याने खळबळ आहे. कुटुंबीयांसह वाढदिवसाची पार्टी करून मध्यरात्री घरी परतताना त्यांच्या कारवर दोघा बाइकस्वारांनी गोळ्या झाडल्या. जोशी बचावले. पण ३५ लाख लोकसंख्येचे नागपूर रक्तबंबाळ आहे. २४ तास उलटूनही हल्लेखोर सापडलेले नाहीत. नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे तपास दिला आहे. विधिमंडळातही आमदारांनी हा विषय मांडताना चिंता व्यक्त केली. सरकारने […]

Read More

एकही दादा, अजितदादा !

बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजितदादा पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने म्हणजे एसीबीने क्लीन चिट दिली आहे. तीन दिवसांच्या सरकारच्या राजीनाम्यानंतर एसीबीच्या नागपूरच्या अधिकाऱ्याने अजितदादांना क्लीन चिट दिली होती. आता एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी मोठा दिलासा दिला. सरकार वाकते. वाकवणारा पाहिजे, असे काही आहे का? महाविकास आघाडीच्या राज्यात क्लीन चिट स्वस्त […]

Read More

उद्धव सरकारने वचन मोडले

सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन गुंडाळून उद्धव ठाकरे सरकारने मुंबईचे विमान पकडले. महाविकास आघाडी सरकारचे विदर्भातले पहिले अधिवेशन म्हणून उत्सुकता होती. ह्या अधिवेशनात विशेष कामकाज नव्हते. शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हेच केंद्रस्थानी होते. काय दिले ह्या सरकारने शेतकऱ्यांना? दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करून उद्धव यांनी टाळ्या घेतल्या. पण भाजपने सभात्याग करून नाराजी नोंदवली. ज्याच्यावर तीन […]

Read More

शरद पवारांचे धक्कातंत्र; गृह खाते विदर्भाला?

लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा निर्णय पवारांनी केला […]

Read More