अमिताभ बच्चन आजारी, शस्त्रक्रिया होणार

सुपरस्टार ७८ वर्षे वयाचे अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली आहे.  त्यांच्यावर  लवकरच एक मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे.  खुद्द अमिताभ यांनीच  आपल्या ब्लॉगमध्ये  शनिवारी रात्री ही माहिती दिली.  यापेक्षा जास्त आपण लिहू शकत नाही असेही ते म्हणाले आहेत.   अमिताभ यांनी एकच ओळ  लिहिली आहे. पण ह्या ओळीने   साऱ्यांना हादरवून टाकले.  अनेकांच्या डोळ्यात  पाणी आले. घरचाच […]

Read More

पूजा, संजय, उद्धव ठाकरे आणि एक वाघीण…

आपला वनमंत्री संजय राठोड याचे काय करायचे?   राजीनामा घ्यायचा की चालू द्यायचे?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड  टेन्शनमध्ये आहेत.  एवढा ताणतणाव तर त्यांना  भाजपला सोडचिठ्ठी देतानाही आला नव्हता. पूजा राठोड तर जीवानिशी गेली आणि आता महाआघाडी सरकारचा श्वास कोंडतो आहे. आता हे प्रकरण पुजापुरते किंवा संजय राठोडपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा  प्रश्न […]

Read More

मुकेश अंबानींच्या जीवावर कोण उठलं असेल?

प्रसिध्द उद्योगपती आणि रिलायन्स  समुहाचे  सुप्रीमो   ६३ वर्षे वयाचे मुकेश अंबानी यांच्या जीवावर कोण उठलं असावं?  काल  रात्री मुंबईतील  त्यांच्या  बहुमजली घराजवळ रस्त्यालगत   स्फोटकांनी भरलेली   स्कोर्पियो कार  सापडल्याने  खळबळ आहे.  कारमध्ये एक पिशवी सापडली.  तिच्यातल्या पत्रात ‘ये तो ट्रेलर है’  अशा शब्दात  अंबानी यांना धमकी आहे. कारमध्ये   जिलेटीनच्या २१  कांड्या  सापडल्या.   खाणकामासाठी   स्फोट घडवण्याकरिता असल्या […]

Read More

हमाम मे सब नंगे

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय अधिकारी, स्पष्टवक्ते म्हणून प्रसिध्द आहेत.  महाराष्ट्र पोलिसांमध्ये जे ५-२५ निष्ठावान अधिकारी आहेत त्यामध्ये नगराळे हे एक आहेत.  गुरुवारी त्यांनी नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.  त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक धक्कादायक विधान केले. नगराळे म्हणाले, ‘भ्रष्टाचार हा  केवळ पोलीस, वन व महसूल विभागातच आहे असे नाही.   […]

Read More

‘मी मास्क घालतच नाही’ असे राज ठाकरे कसे बोलू शकतात?

मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे  वेगळे रसायन आहे.  त्यांच्या सभा, त्यांची वक्तव्ये एकदम हटके  असतात.  त्यामुळेच कुठल्याही  पुढाऱ्याच्या  सभांना  होत नाही तसली गर्दी त्यांना ऐकायला होते.   आज त्यांनी ‘मी मास्क घालतच नाही.  तुम्हालाही सांगतो’  असे पत्रकारांना सांगून  नव्या  चर्चेला तोंड फोडले.                      करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना   काळजी घेण्याचे आवाहन  प्रशासन  वारंवार करीत आहे.  मास्क घालायला […]

Read More

वाघ बनल्या वाघीण

             हा महिना दोन गोष्टींनी गाजतोय.  पहिली  म्हणजे कोरोना. दुसरी  गोष्ट म्हणजे  वनमंत्री संजय राठोड. करोनाच्या केसेस  सारख्या वाढत आहेत. आता तर तो शाळांमध्येही पसरू लागला आहे.   लोकांनी काय करावे हे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोकळे झाले.  पण सरकार काय करतय ते कळायला मार्ग नाही.   चेहऱ्याला  मास्क नाही म्हणून  दंड  वसुलीचा सपाटा सुरु आहे. पण  […]

Read More

पोहरादेवीत करोना

विदर्भात  करोनाचे रुग्ण वाढत आहेत.    अमरावती, वाशीम, नागपूर  जिल्ह्यांमध्ये मोठा त्रास आहे. अशा वेळी एक धक्कादायक बातमी आली आहे. वाशीम जिल्ह्यातील  पोहरादेवी गडावर   खुद्द महंत  कबीरदास महाराज  यांच्यासह    त्यांच्या कुटुंबातील  तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.  इथे एकूण १९ जण पॉजिटीव्ह निघाले आहेत.              २३ फेब्रुवारी रोजी  वनमंत्री संजय राठोड गडावर आले […]

Read More

पाकिस्तानात पेट्रोल ५१ रु., नागपुरात ९७ रु.

आपल्या   देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती आकाशाला  भिडत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने  आपल्याकडे  पेट्रोल-डिझेल महाग आहे.   आणि ते आणखी महाग होऊ शकते. जगातील तेल उत्पादक देशांनी  फेब्रुवारी अखेरपर्यंत  कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यात येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.  त्यामुळे करोनाकाळातही मागणीच्या तुलनेत  पुरवठा कमी असल्याने भाव भडकले आहेत.                   आज नागपुरात पेट्रोल ९७ रुपये […]

Read More

फोडाफाडी सुरु, सांगलीत जयंत पाटलांनी केला चंद्रकांतदादांचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सत्तेचा महिमा अपार आहे.   युतीच्या राजवटीत दोन्ही कॉन्ग्रेसमधले  नेते  भाजपमध्ये घुसू पाहत  होते. भाजपचे तिकीट म्हणजे सत्तेचा पासपोर्ट मानला जात होता. मात्र गेल्या वर्षी राज्यात महाआघाडीची  सत्ता आली  आणि भाजपला ‘बुरे दिन’ आले.  आता उलटी लाट सुरु झाली आहे.  भाजपमधून  बाहेर पडण्याची संधी  अनेक आमदार शोधत आहेत.  उद्धव सरकार लवकरच पडेल असे सांगून   भाजप नेत्यांनी  […]

Read More

राठोड यांचा मुंडे झाला?

            कुणी कितीही पटका,  वनमंत्री आणि शिवसेना नेते  संजय राठोड यांचा बाल बाका होणार नाही.  करोनाच्या भाषेत बोलायचे झाले तर राठोड  ‘निगेटिव्ह’ आहेत, ‘निगेटिव्ह’ राहतील.  राठोड यांना आज सरकार दरबारी जी   वागणूक मिळाली त्यावरून हे स्पष्ट झाले.  मराठवाड्यातील पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येच्या  वादात अडकलेले   राठोड  १५ दिवस गायब होते.  काल  अचानक ते पोहरादेवी गडावर […]

Read More