आमिर खानने घेतला सोशल मिडिया संन्यास

वाढदिवसाला  एखादी वाईट गोष्ट  सोडून देण्याची पद्धत आपल्याकडे आहे.  कोणी दारू सोडतो, कुणी जुगार सोडतो.  लोकप्रिय  चित्रपट अभिनेता आमिर खान याने चक्क  सोशल मिडिया सोडला.  त्याचा सोशल मिडीयाचा  संन्यास  प्रचंड गाजतो आहे.  १४ मार्चला आमिर ५६ वर्षाचा झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने आपली अखेरची पण तिरकस पोस्ट टाकली.  ‘मी खूप सक्रीय आहे, हा देखावा बंद […]

Read More

आत्महत्यांभोवती फिरणे महाराष्ट्राला परवडेल?

दोन महिन्यांपासून आत्महत्या  हा विषय राज्यात गाजतो आहे.  तसे पाहिले तर दररोज  डझनाने आत्महत्या होतात. पण वेगवेगळ्या कारणाने  झालेल्या ह्या तीन आत्महत्या उद्धव सरकारच्या पाठीशी  जणू  हात धुवून लागल्या आहेत.  महाराष्ट्राचे राजकारण ह्या आत्महत्याभोवती फिरते आहे.  मृत व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हा हट्ट समजू शकतो. पण त्यासाठी   सरकारला कोंडीत  पकडणे  राज्याला परवडणारे नाही.  राज्यापुढे करोना, […]

Read More

‘बने बने, पहा, मंत्रालयाचे अजून सचिवालयच आहे ग! ’ – मधुकर भावे

साधारणपणे ५० वर्षे झाली असतील. ‘महाराष्टÑ टाइम्स’चे त्यावेळचे बुध्दिमान संपादक श्री गोविंदराव तळवलकर यांनी, कधी नव्हे तो, एक खुसखुशीत आणि प्रहसनात्मक सुंदर अग्रलेख लिहीला होता. त्या अग्रलेखाच नाव होतं ….‘बने बने, पहा हे सचिवालय’… त्यावेळी सचिवालयाचे ‘मंत्रालय’ झालेले नव्हते. अर्थात ‘सचिवालय’ किंवा ‘मंत्रालय’ या शब्दाच्या फरकाने गेल्या ५० वर्षांतील कामकाजात फार मोठा गुणात्मक फरक झाला […]

Read More

उद्धव नाणार देणार?

        आपल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना  कधी कुठला झटका येईल ते सांगता येत नाही.  भाजप असो की शिवसेना,   दोघांच्याही घोषणा चमकोगिरीच्या  असतात.  कोणीही कुठल्या भूमिकेवर ठाम नसतो.  सरडाही लाजेल, तशा गरजेनुसार भूमिका बदलत असतात.  एकेकाळी   बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे  गोपीनाथ  मुंडे यांनी एनरॉन म्हणजेच दाभोळ प्रकल्प    समुद्रात बुडवून टाकण्याची घोषणा केली होती. पुढे युतीची सत्ता आली […]

Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावेळी तरी नवा सरकार्यवाह देईल काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  सहसा बदलायला तयार नसतो.   हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र.. त्यांची विचारांची बैठक ठरली आहे.   गणवेश बदलायला  किती खळखळ केली? पण मोहन भागवतांनी  गणवेश बदलून घेतला.  तसाच पेच आता आहे.  संघाची दोन दिवसांची  अखिल भारतीय  प्रतिनिधी सभा   आजपासून कर्नाटकात  बेंगळूरू येथे सुरु झाली.    तिच्यात  संघाचा नवा  जनरल सेक्रेटरी म्हणजे सरकार्यवाह  निवडला जाणार आहे.  निवड […]

Read More

का पळत आहेत मंत्री संजय राठोड?

 परळीची तरुणी पूजा राठोड हिच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस  वाढत आहे. या प्रकरणी  राज्याचे वनमंत्री संजय राठोड   यांच्याकडे   भाजपने बोट  दाखवले आहे. पण  राठोड  बेपत्ता आहेत. १० दिवसांपासून  ते गप्प का? हा  प्रश्नच आहे.  ते लपले, की लपवले जात आहेत की चौकशी पूर्ण होईपर्यंत शिवसेनेकडूनच त्यांना लपायला सांगण्यात आले आहे?  खूप सारे प्रश्न आहेत. आज मंत्रिमंडळाच्या […]

Read More

जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमालमान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार -मधुकर भावे

आॅगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. […]

Read More

शरद पवारांनी केला अजितदादांचा गेम?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद लांबल्याची जोरदार चर्चा आहे. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल अशी चर्चा सुरु झाल्याने अजितदादा पुन्हा ‘नॉट रिचेबल’ होण्याची भीती वाढली आहे. नागपूर अधिवेशन १६ डिसेंबरला सुरु होऊन २२ डिसेंबरला संपत असल्याची माहिती आहे. तो पर्यंत अजितदादांना टांगून ठेवणार की काय ह्या शंकेने त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. विधानसभेचा […]

Read More

‘नाना’गिरीने विदर्भ जोरात

अवघ्या २० वर्षांच्या राजकीय आयुष्यात मोठी वादळं अंगावर झेलत आलेल्या नाना पटोले यांना नव्या सत्तास्थापनेत विधानसभा अध्यक्षपद देतील असे कुणालाही वाटले नव्हते. ‘तुम्हाला कृषिमंत्रिपद मिळेल असे वाटले होते’ असे खुद्द विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करताना विधानसभेत केलेल्या भाषणात म्हटले. खरेच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव ह्या खुर्चीसाठी ठरले होते. पण […]

Read More

असंतुष्ट आत्म्यांची खदखद

‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून भाजपची ओळख आहे. भाजप पक्षशिस्तीला सर्वोच्च महत्त्व देतो. पण सध्या जे सुरू आहे ते भाजपच्या परंपरेला धरून नाही. प्रत्येक पक्षात नाराज लोक असतात. भाजपमध्येही होते. पण ते बाहेर बोलत नसत. राज्याची सत्ता हातून गेल्यानंतर नाराजांनी डोके वर काढले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चार दिवसांवर आले असताना भाजपचा ओबीसी चेहरा पंकजा मुंडे […]

Read More