अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी धावले शरद पवार

शरद पवार प्रत्येक निवडणूक  जिंकत आले. पराभव त्यांना माहित नाही. पण आज त्यांची फजिती झाली. आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याची धडपड त्यांच्या अंगाशी आली. ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या  खळबळजनक पत्रानंतर  महाआघाडी सरकार संकटात  आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांची खुर्ची  धोक्यात आहे. सचिन वाझे देशमुखांना भेटला की नाही हा कळीचा मुद्दा बनला […]

Read More

अनिल देशमुखांचे ‘काका, मला वाचवा’

सोशल  मिडीयावर आज एक विनोद खूप  व्हायरल  होतोय. ‘कोरोनापासून  तुम्हाला  स्वतःच स्वतःला  वाचवायचे आहे. कारण   सरकार सध्या   स्वतःला  वाचवण्यात व्यस्त आहे.’ विनोदाचा भाग सोडला तरी  परिस्थिती तशीच आहे. मुंबईचे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने     महाआघाडी सरकारमध्ये उडालेली खळबळ  २४ तासानंतरही कायम आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकाल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लावतील’  असे  राष्ट्रवादीतले ‘काका’  […]

Read More

बँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का ? -ज्ञानेश वाकुडकर

भारतासारख्या खंडप्राय देशाला पंडित नेहरू यांनी स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था हीच आजही योग्य आहे, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. अर्थात काही अर्धवट, सुपारीबाज आणि नेहरुद्वेशी लोकांना नेहरूंच्या नावाने गरळ ओकण्याशिवाय दुसरा धंदा नाही. इंदिरा गांधींनी खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या मोठ्या बँकांची दारं कधी नव्हे ती सामान्य माणसाला काही प्रमाणात का होईना […]

Read More

लेटरबॉम्बने उद्धव सरकारमध्ये भूकंप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंग यांनी  राज्यातल्या  महाविकास आघाडी सरकारवर आज लेटरबॉम्ब टाकला.  ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  सचिन वाझेला  दर महिन्याला  १०० कोटी रुपये गोळा करायला सांगितले होते’   अशा मजकुराचे पत्र  परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून   मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.  त्यांनी सोबत पुरावाही जोडला. राज्यपालांनाही ते पत्र पाठवले. ‘हा […]

Read More

पेशंट वाढले, नागपुरात लॉकडाउन वाढवला

नागपूरकरांना ज्याची भीती वाटत होती तेच झाले. सात दिवसाचा लॉकडाउन लावूनही  करोनाचे पेशंट    कमी झाले नाहीत.  उलट दररोज  तीन हजार  पेशंटची भर पडत आहे. लोक आता बेफिकीर झाले आहेत. सरकार सांगून सांगून ठाकले. पण रस्त्यावरची गर्दी कमी व्हायला तयार नाही.  शुक्रवारी एकाच दिवशी करोनाने ३५ बळी घेतले.  करोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे येत्या  ३१ मार्चपर्यंत […]

Read More

‘मोदींचा माणूस’ दत्ताजी होसबळे बनले संघाचे नवे सरकार्यवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाने कात  टाकली.  तब्बल १२ वर्षानंतर आपला जनरल सेक्रेटरी म्हणजे सरकार्यवाह आज बदलला.    ६५ वर्षे वयाचे कर्नाटकचे दत्तात्रय होसबळे  यांना  सरकार्यवाह निवडले.   ७३ वर्षे वयाचे भय्याजी जोशी यांच्या जागी  ते  आले आहेत.  संघाची दोन दिवसाची  अखिल भारतीय प्रतिनिधी सभा   बेंगळूरू येथे सध्या सुरु आहे. तिच्यात  एकमताने ही निवड झाली. संघात हे एकच पद […]

Read More

राम आला भाजपमध्ये

निवडणुका आल्या की  राजकीय पक्षांना  देवाधर्माची  आठवण होते.  तो पक्ष भाजप असेल तर मग विचारूच नका.  सध्या बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची  रणधुमाळी सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर भाजपने  थेट  रामाला  खेचले आहे. रामानंद  सागर यांच्या ‘रामायण’ ह्या  भयंकर लोकप्रिय टीव्ही मालिकेत  प्रभू श्रीरामाची भूमिका  करणारे  अभिनेते अरुण गोविल  यांनी भाजपमध्ये   प्रवेश केला आहे. हा राम  १९८८ […]

Read More

कोवीशिल्ड वॅक्शीन घेताने कोल्ड चेन मेनटेन आहे हे पाहिले का .?

नमस्कार मित्रांनो,मी कुतूहल म्हणून सर्व डाॅक्टर मित्रांना विचारले कि कोवीशिल्ड वॅक्शीन घेताने कोल्ड चेन मेनटेन आहे हे पाहिले का .?बर्याचजणांना विचारलेतर डाॅ अभिजित अन्नदाते नी सांगितले , “नाही. मी एका समजुतदार, शहाण्या पेशंटसारखा स्टूलवर बसलो, बाही वर केली, लस टोचून घेतली आणि बाहेरच्या हाॅलमध्ये येवून अर्धा तास बसलो, रिअॅक्शन काही आली नाही, पॅरासिटॅमाॅलच्या गोळ्यांची पुडी […]

Read More

MNC जळगावमध्येही भाजपला धक्का, महापालिका हातची गेली

भाजपला सध्या राज्यात  ‘बुरे दिन’ सुरु आहेत.  राज्यातली  सत्ता गेल्याला सव्वा वर्ष होत आले आहे.  आता  महापालिकाही हातातून निसटत आहेत.  फोडाफोडीत भाजपचा हात कुणी पकडू शकत नाही. पण आता नगरसेवकही फुटू लागले आहेत.  गेल्या महिन्यात   राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी  सांगली महापालिकेत भाजपचा ‘कार्यक्रम’ केला. आज  जळगाव महापलिकेत  शिवसेनेने   भाजपला दणका  दिला.  […]

Read More

वाझेंनी परमबीर सिंगांना खाल्ले

सचिन वाझे खूप लोकांना खाणार आहे. तो स्वतः तर बुडणारच. पण  अनेकांना घेऊन बुडणार आहे. आज पहिली विकेट गेली.  त्याचा बॉस मुंबईचे  पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांना   उद्धव सरकारने  हटवले.  त्यांच्या जागी पोलीस महासंचालक   हेमंत नगराळे यांना आणले आहे.    पोलीस कोठडीतील एका मृत्यू प्रकरणात  १६ वर्षापूर्वी   वाझेला  निलंबित करण्यात आले होते.  त्यासंबंधी अजूनही कोर्टात खटला […]

Read More