श्री गजानन महाराज प्रगट दिन

Editorial News

माघ वद्य ७ शके १८००(२३ फेब्रुवारी १८७८)या दिवशी १८वर्षाचे गजानन महाराज शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेमध्ये लोकांची दृष्टी असे मानले जाते. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठा बाहेर  उष्ट्या पत्रावळी तील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे “कोणा हा कोटींचा काहीच कळेना ब्रह्माच  ठिकाण कोण सागे। साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना।। 
महाराजांच्या प्रगटदिना निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. महाराजांना झुणका-भाकर सोबत मुळा/ मुळ्याच्या शेंगा, हिरवी मिरची, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी  अमर्यादपणे चित्रविचित्र खाणे खावे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे, अशी त्यांची रीत होती. भक्तांनी दिलेल्या प्रसाद प्रसन्न भावाने सेवन करीत.  गरिबांच्या घरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकते अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले,  असे पदार्थ महाराज आवडीने खात, म्हणून भंडा-यासाठी इतर पक्कवना व्यतिरिक्त ज्वारी भाकरी, पिठले व अंबाडीची भाजी अवश्‍य करतात. 

 गजानन महाराज देवस्थान संस्थान या नावाने 1908 मध्ये तर स्थापन झाले तेव्हापासून या ट्रस्ट मार्फत गजानन महाराज देवस्थानचे कार्य केले जाते. ओंकारेश्वर, आळंदी, पंढरपूर, त्रिंबकेश्वर याठिकाणी देवस्थानच्या वास्तु आहेत निवासस्थान, गजानन मंदिर स्थापन करण्यात आलेली आहे.  विजय ग्रंथ गजानन महाराजाची पोथी ग्रंथ २१ अध्याय असून ३६६८ओव्या यामध्ये आहेत.एक सर्व भक्तांना उर्जा देण्याची शक्ती आहे. केव्हाही कोणाच्याही परिस्थिती भक्तांना तारणार आहे असा सर्व भक्तांचा विश्वास आहे. बऱ्याच भक्तगणांना हा ग्रंथ मुखोद्गत आहे ८२ वर्षाच्या  भगिनी नाशिक मध्ये आहे तर बरेच जण महाराष्ट्रात इतर ठिकाणी वास्तव्य आहे ज्यांना हा ग्रंथ मुखोद्गत आहे. ही वेगळीच लीला म्हणावी लागेल. महाराजांचे सण-उत्सव आता फक्त शेगाव व महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आता भारतभर व जगभर साजरे केले जातात. आपण आता नवीन यूट्यूब द्वारे ते पाहू शकतो. अमेरिकेमध्येही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील बरेच जण अमेरिकेत वास्तव्याला असल्यामुळे वास्तव्यास  तेथे श्री गजानन महाराज उत्सव आनंदाने साजरा करतात.
गण गण गणांत बोते..

0 Comments

No Comment.