‘जनतापर महंगाई की मार, ‘महंगी’ पडी मोदी सरकार…’ मधुकर भावे

Analysis News

खूप दिवसांनी कॉंग्रेसमधील ‘चिंतन समूह’ जागा झालेला दिसतो आहे. गेल्या सहा वर्षांत भाजपाच्या ‘थिंक टँक’ने विचारपूर्वक अविचारी प्रचार किती प्रभावी होऊ शकतो, सामान्य माणसाला कस फसवलं जाऊ शकतं. याचे अनेक प्रयोग करुन दाखवले. महागाई वाढल्याच्या नावावर, देशातल्या काळ्या पैशाच्या नावावर, भ्रष्टाचाराच्या नावावर…. या सगळ्या प्रचार-अपप्रचारात भाजपाच्या या चिंतन ग्रुपमागे काही बुध्दिवादी लोक होते. भ्रम पैदा करण्यात ते पटाईत होते. त्यांच्या सहाय्याला अनेक वाहिन्या होत्या, त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने अपप्रचाराची एक रणधुमाळी सहा वर्ष धुळवडीसारखी खेळली गेली, त्यामुळे सहा वर्षांत जेव्हा महागाईमुळे माणस हैराण झाली, सामान्य माणसाच जीवन अशक्य झालं त्यावेळी भाजपाच्या या गोबेल्स प्रचारतंत्राला त्याचभाषेत उत्तर देणे गरजेच होतं. बरेच दिवसानंतर कॉंग्रेसच्यावतीने जारी झालेलं एक भिंतीपत्रक पाहण्यात आलं. त्याचा परिणाम किती होईल, ते काळ ठरवील. पण ग.दि.माडगूळकर यांनी ‘गीतरामायणात’ म्हटल्याप्रमाणे

‘अंत उन्नतीचा होई रे जगात,
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत’

या ओळी आता भाजपाला लागू पडत आहेत. अपप्रचाराच शिखर गाठून भाजप आणि त्यांचे पंतप्रधान अत्युच्च शिखरावर पोहोचले. लोकप्रियतेची आणि पाठिंब्याची उंचीच आता संपली. त्याच्यावर आता उंची नाही, तिथुन आहे तो उतारच आहे. त्यामुळे कॉंग्रेसने या सगळ्याचा विचार करुन एक प्रभावी पोस्टर टाकलं आहे. राहुल गांधी आक्रमक झालेले आहेत. राज्य-राज्य पातळीवरचे कॉंग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत. महाराष्टÑापुरतं बोलायचं तर, प्रदेश कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष नाना पटोले यांनी मैदानात उतरण्याची सुरुवात केलेली आहे. कधी नव्हे ती महाराष्टÑ प्रदेश कॉंग्रेस आणि मुंबई कॉंग्रेस – दोन्ही कॉंग्रेसचे अध्यक्ष कमालीचे एकरुप होऊन कामाला भिडलेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे. अशा या सगळ्या नव्या वातावरणात कॉंग्रेस आक्रमक झाली तर, २०२४ पर्यंत सहा वर्षांतील महागाई, बेकारी, काळ्या पैशाचा निर्माण केलेला खोटा भ्रम, शेतकºयांवर जुलम, जबरदस्ती करणारे कायदे, जी.एस.टी, नोटाबंदी या सगळ्या धोरण आणि घोषणांचा शेवटी झालेला परिणाम महागाईच्या स्फोटात होईल. सहा वर्षात पेट्रोलचे दर ५० रुपयांवर १०० रुपयापर्यंत गेले आहेत, डिझेलचे दर ४४ रुपयांवरुन ९० रुपयांवर गेले, घरगुती गॅसस सिलेंडर ३५० वरुन ८०० रुपयांवर आला आणि प्रत्येक पेट्रोलपपांवर पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासह रसोई तयार करणाºया महिलेचे चित्र छापून पुन्हा घोषणाबाजी झाली, त्या जाहिरातीचा भांडाफोड एन.डी.टीव्हीने निकालात काढला. प्रत्येक गोष्टीमध्ये गेल्या ६ वर्षांत सरकार उघड्यावर पडले आहे. रिझर्व्ह बँक आणि सरकार असा संघर्ष कधीच नव्हता, विकासदर घसरत गेला, त्याची काळजी रिझर्व्ह बँकेला वाटली. पण अर्थमंत्र्यांना आणि केंद्र सरकारला वाटली नाही. देशातल्या एक-एक संस्था विकायला सुरुवात झालेली आहे. कालचा दुय्यम, तिय्यम दर्जाचा उद्योग व्यावसायिक गेल्या सहा वर्षांत देशात क्रमांक दोनचा उद्योगपती झालेला दिसतो आहे. आणि सामान्य माणसं महागाईच्या वणव्यात होरपळून गेली, अस हे अतिशय विसंगत चित्र सातत्याने लोक अनुभवित आहेत. परिणामी येणाºया प्रत्येक निवडणुकीत देशातल्या सामान्य माणसांचा मुख्य शत्रू भाजपा ठरणार आहे. काही राज्यात होणाºया निवडणुकांमध्ये राजकारण खेळलं जातयं, बंगालसारख्या राज्यात आठ टप्प्यात कधीही निवडणुक झाली नव्हती, ‘ही व्यवस्था’ कोणासाठी केली आहे हे न समजण्याऐवढा बंगाली मतदार मूर्ख नाही. त्यामुळेच ‘भाजपा विरुध्द सर्व विरोधक’ अशी बंगालमधली लढाई, मोदी-शहा यांचे बेत हाणून पाडेल. जे महाराष्टÑात घडले ते बंगालमध्येही घडेल. पश्चिमेकडचे हे महत्वाचे पुरोगामी राज्य फडणवीस, चंद्रकांत पाटील टोळीच्या हातातून आघाडीने हिसकावून घेतले, आता तीच आघाडी बंगाल भाजपाच्या हातात जाऊ देणार नाही. सहा वर्षापूर्वीच्या महागाईच्या प्रचार वाक्यांमध्ये बदल करुन कॉंग्रेसने सुरुवात चांगली करुन दिली. त्यामुळे मोदी सरकार सामान्यांसाठी फार महागात पडले आहे, त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागणार आहे. मोदींचे खास मित्र अमेरिकेचे ट्रम्प यांच्या प्रचाराकरीता मोदींनी अमेरिकेतील निवडणुक प्रचार मोहिमेत सहभागी होऊन आपण कोणाचे मित्र आहोत हे जाहीरपणे सांगून टाकले. अमेरिकेतल्या जनतेने मोदींच्या मित्राला नाकारले. या देशातली जनता वाढत्या महागाईमुळे आता मोदींनाच नाकारण्याची वेळ आली आहे म्हणून कॉंग्रेसनं योग्य वेळी प्रसिध्द केलेल्या

‘जनतापर महंगाई की मार,
महंगी पडी मोदी सरकार…’

या प्रचार फलकाचं परिणाम निश्चितच प्रभावी ठरणार आहे.

सहा वर्षापूर्वीचे ते दिवस… त्या घोषणा… खासकरुन महाराष्टÑात छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपाने निवडणुक प्रचारात केलेला वापर, भडकत्या महागाई विरोधातील ती आगपाखड, काळ्या पैशाविरोधातील पध्दतशीरपणे रचलेले कुंभाड… त्यावेळच्या धादांत खोट्या प्रचाराचा ठेका घेतलेल्या काही वाहिन्यांनी भाजप आणि मोदी यांची उचललेली पालखी, त्यावेळचे देशात निर्माण झालेले भय, खुद्द मोदींच्या मंत्रीमंडळात असलेल्या भाजपच्याच मंत्र्यांना गुदमरुन टाकणारं देशातलं ते वातावरण, सामान्य माणसांचा कसलाही विचार न करता गेल्या ६ वर्षांत देशातल्या एक- एक संस्थांची सुरु झालेली विक्री… गेल्या सहा वर्षांच हे फलित आहे. ज्यांनी महागाईविरोधात फलक लावून मतं मागितली त्याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात अधिकारावर आलेल्या भाजपाच्या

६ वर्षांच्या काळात सामान्य माणसाचं अशक्य झालेलं जगणं… जरा आठवून बघा.


Hi MAHARASHTRA

Please Subscribe Hi Maharashtra News Channel on You Tube and visit our www.himaharashtra.com​ website For more update about latest news, news analysis and Political Opinion,

Subscribe, Fallow and Like us on-
Website- https://www.himaharashtra.com​
Facebook- https://www.facebook.com/himaharashtranews
Twitter- https://twitter.com/himaharashtra
Youtube – https://www.youtube.com/channel/UCVX4MumhDHBhYzKBykTtCrg

#himaharashtra #news #analysis #Political_Opinion

Mail us for any suggestion
himaharashtra@gmail.com

0 Comments

No Comment.