‘मी मास्क घालतच नाही’ असे राज ठाकरे कसे बोलू शकतात?

Analysis Editorial News

मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे  वेगळे रसायन आहे.  त्यांच्या सभा, त्यांची वक्तव्ये एकदम हटके  असतात.  त्यामुळेच कुठल्याही  पुढाऱ्याच्या  सभांना  होत नाही तसली गर्दी त्यांना ऐकायला होते.   आज त्यांनी ‘मी मास्क घालतच नाही.  तुम्हालाही सांगतो’  असे पत्रकारांना सांगून  नव्या  चर्चेला तोंड फोडले.

                     करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना   काळजी घेण्याचे आवाहन  प्रशासन  वारंवार करीत आहे.  मास्क घालायला सांगत आहे. पण  राज ठाकरेंनी उलटी टेप लावली.  प्रसंग होता मुंबईतल्या मराठी भाषा दिनाचा.  ह्या कार्यक्रमाला  राज  मास्क न घालताच आले होते.  पत्रकारांनी त्यांना याबाबत छेडले असता राज म्हणाले,  मी मास्क घालतच नाही.  ते पुढे म्हणाले,   ‘राज्यात अनेक कार्यक्रमांना गर्दी होते.   मंत्री  व इतर लोक गर्दी करून धुडगूस घालतात. ते चालते. पण शिव जयंती, मराठी भाषा दिन कार्यक्रमाला   परवानगी नाकारली जाते.  करोनाची एवढीच काळजी  आहे तर  निवडणुका एक वर्ष पुढे ढकला.’

       चेहऱ्याला  मास्क नसेल तर   सरकारचा दंड आहे.  अशा दंडाची वसुली जोरात सुरु आहे. त्यामुळे  मुंबई  महापालिका किंवा प्रशासन  राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार? ते आता पहायचे. एक सांगू का?  करोनाचा वाढता संसर्ग  रोखण्यासाठी  सरकार  युध्द पातळीवर लढत आहे.  चाचण्या वाढवल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढला आहे. पण   काही लोक वेगळा सूर लावतात. त्यामुळे विनाकारण  गैरसमज पसरतात.  करोनाची लस सुरक्षित आहे असे दोन्ही डोस घेणारे  पोलीस अधिकारी सांगत असताना   अजूनही काही लोक घाबरतात.  लसीची सक्ती नको  असे  काही ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.  ‘एकही मंत्र्याने लस घेतली नाही. मग  आम्हा लोकांवर सक्ती का?’  असा सवाल एक म्हाताऱ्याने केला.

                         करोनाला येऊन  वर्ष होत आहे. अजूनही तो पूर्णपणे समजलेला नाही. औषधही नाही.  लस आली.   ल्शिवारही अनेकांनी प्रश्नचिन्ह लावले.  कोरोनाच्या  चाचण्यांबाबतही   अनेकदा संभ्रमावस्था  निर्माण  होते.  नागपुरात एक कोलेजात  पॉझिटिव्ह  निघालेले   सहा जण  दोन दिवसाच्या अंतराने केलेल्या चाचणीत  निगेटिव्ह निघाले.  कोणतेही उपचार न घेता  इतक्या कमी कालावधीत  केलेल्या चाचण्यांचे निकाल  वेगवेगळे कसे काय येऊ शकतात  असा प्रश्न आहे.  असे अनेक प्रश्न आहेत. ज्यांचे समाधानकारक उत्तर मिळू शकत नाही.

0 Comments

No Comment.