विदर्भात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अमरावती, वाशीम, नागपूर जिल्ह्यांमध्ये मोठा त्रास आहे. अशा वेळी एक धक्कादायक बातमी आली आहे. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर खुद्द महंत कबीरदास महाराज यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. इथे एकूण १९ जण पॉजिटीव्ह निघाले आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी वनमंत्री संजय राठोड गडावर आले होते तेव्हा हजारो लोकांनी गर्दी केली होती. कबीरदास महाराज सावलीसारखे राठोड यांच्यासोबत होते. आता ह्या संसर्गाची जबाबदारी कोण घेणार? चाचणी झाल्याने सध्या फक्त १९ जण लक्षात आले. पण इतरांना संसर्ग झाला असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वाशीम जिल्हा करोनाचा हॉट स्पॉट मानला जातो. ह्या पार्श्वभूमीवर राठोड यांचे शक्तीप्रदर्शन करोना वाढवणार की काय ह्या भीतीने लोकांच्या पोटात गोळा उठला आहे.