संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी एसबीएल एनर्जीकडून नागपुरात अत्याधुनिक टीएनटी प्रकल्पाचे उद्घाटन

Editorial Maharashtra Nagpur

नागपूर, ३ सप्टेंबर २०२४: भारतातील सर्वात मोठ्या खाण आणि औद्योगिक स्फोटक उत्पादकांपैकी एक असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेडने तिच्या टीएनटी उत्पादन प्रकल्पाचे आज उद्घाटन केले. महाराष्ट्रातील नागपूर येथील येनवेरा येथे कंपनीच्या २२५ एकर उत्पादन सुविधेमध्ये स्थापित केलेला टीएनटी प्रकल्प असून, हा अशा प्रकारचा भारतातील खासगी क्षेत्रातील कोणत्याही कंपनीद्वारे कार्यान्वित झालेला दुसराच प्रकल्प आहे. ३,००० टन प्रति वर्ष क्षमतेचा अत्याधुनिक टीएनटी प्रकल्प हा केवळ निर्यातलक्ष्यी प्रकल्प असून, तो एसबीएल एनर्जीला ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेसारख्या बाजारपेठांमध्ये तिची निर्यात तिपटीने वाढवण्यास मदत करेल.

आयातीवरील मदार कमी करण्यासाठी, खात्रीशीर पुरवठा निश्चित करण्यासाठी, खर्चात कार्यक्षमतेसाठी आणि संरक्षण सामग्रीचे उत्पादन मजबूत करण्यासाठी टीएनटीच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचे एसबीएल एनर्जीचे उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा, खाणकाम आणि संरक्षण सामग्रीचे उत्पादन यासारख्या क्षेत्रांतून वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प एसबीएल एनर्जीच्या कार्यादेश आणि कमाईला चालना देईल.

भारताचे माजी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी ३ सप्टेंबर २०२४ रोजी एसबीएल एनर्जी लिमिटेडचे सीईओ आलोक चौधरी; अध्यक्ष दिव्यांश चौधरी; आणि संरक्षण सामग्री व्यवसायाचे अध्यक्ष कर्नल शैलेंद्र पाठक, या नेतृत्वदायी संघाच्या उपस्थितीत या टीएनटी प्रकल्पाचे उद्घाटन केले.

टीएनटी प्रकल्पाच्या कार्यान्वयनावर भाष्य करताना, एसबीएल एनर्जी लिमिटेडचे ​​चेअरमन संजय चौधरी म्हणाले, “वाढते औद्योगिकीकरण, बांधकामे, पायाभूत सुविधांचा विकास आणि खाणकाम उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर आमचा हा टीएनटी प्रकल्प मजबूत उत्पादन क्षमतेसह स्फोटकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा प्रकल्प म्हणजे भारताच्या संरक्षण पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी, देशांतर्गत उत्पादन आणि संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी देशाच्या एकूण संरक्षण क्षमतांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून कार्यान्वित झाला आहे. आमच्या सिव्हिल अॅप्लिकेशन्स  व्यवसायाच्या सर्वंकष एकात्मतेस हा प्रकल्प मदतकारक ठरतो. तसेच औद्योगिक आणि खाणकाम स्फोटकांच्या निर्मितीच्या क्षेत्रात आमचे स्थान अधिक मजबूत करण्यासह, या आघाडीवर जागतिक सहकार्याच्या शक्यता निर्माण करतो. भारताचा भू-राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण संरक्षण सामग्रीचा पुरवठादार म्हणून आम्ही आमची भूमिका बजावत राहू. भविष्यात अशाच क्षमतेचा आणखी एक टीएनटी प्रकल्प उभारण्याची आमची योजना आहे.”

बॉम्ब, तोफखाना आणि इतर स्फोटकांसह विविध प्रकारच्या युद्धसामग्रीच्या उत्पादनांसाठी टीएनटी प्रकल्प पूरक ठरतो आणि अधिक विश्वासार्ह व शक्तिशाली स्फोटकांसह विद्यमान शस्त्रागारांचे आधुनिकीकरण आणि सुधारणा तो सुलभ करतो.

नागपूर टीएनटी प्रकल्पाची स्थापना हा एसबीएल एनर्जीच्या भारतातील उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन उत्पादने प्रस्तुत करण्यासाठी निधी तैनात करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, एसबीएल एनर्जीने प्रमुख गुंतवणूकदारांच्या ताफ्यातून ३२५ कोटी रुपयांचे वाढीचे भांडवल उभारले होते.

एसबीएल एनर्जी लिमिटेडबद्दल सारांशात…

एसबीएल एनर्जी लिमिटेड ही भारतातील औद्योगिक स्फोटकांची आघाडीची उत्पादक आहे. २००२ मध्ये कार्यान्वित झालेल्या या कंपनीचे मुख्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. जवळपास तीन दशकांच्या कार्यान्वयनासह, एसबीएल एनर्जी ही देशातील औद्योगिक स्फोटक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे, जिचा बाजारातील हिस्सा अंदाजे १० टक्के आहे. ही कंपनी प्रामुख्याने खाणकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांना सामग्री पुरवते आणि संरक्षण क्षेत्रात सक्रियपणे ती आपली पावले विस्तारत आहे.

कंपनीची स्पेशल ब्लास्ट्स लिमिटेड नावाची आणखी एक उपकंपनी आहे, जी भारतातील रायपूर येथे कार्यरत आहे. समूह सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू), सरकारी संस्था, संघटित आणि असंघटित क्षेत्र, खाण कंत्राटदार, स्फोटक विक्रेते आणि बांधकाम, तेल साठ्यांचे संशोधन, जल विकास आणि इतर विविध विभागांसह विविध ग्राहकांना सेवा पुरवतो.

अधिक माहितीसाठी https://www.sblenergy.com/ या वेबसाइटला भेट देता येईल.

0 Comments

No Comment.